Tuesday, June 16, 2026
Latest NewsLIFESTYLE

पीसीओएसमध्ये महिलांनी आपल्या शरीराबद्दल अधिक जागरूक रहणे आवश्यक- डॉ. निलेश उन्मेश  बलकवडे

पुणे :  हा पीसीओएस अवेअरनेस मंथ आहे; आणि या पीसीओएस जागरूकता महिन्याच्या निमित्ताने डॉ. निलेश उन्मेश बलकवडे (क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट – ओएसिस फर्टिलिटी )  यांनी  महिलांना त्यांच्या शरीराबद्दल अधिक जागरूक राहण्यासाठी प्रोत्साहित कले आहे व पीसीओएसबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ते म्हणतात, पीसीओएसची  सातत्याने  जाणवणारी लक्षणे आहेत, अनियमित मासिक पाळी  किंवा मासिक पाळी न येणे.  जर  वर्षात सहापेक्षा कमी वेळा मासिक पाळी  येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे आवश्यक आहे. जर महिलांना गर्भधारणेत अडचणी येत असतील तर तो पीसीओएसचा दोष असु शकतो. खरं तर, पीसीओएस असलेल्या महिलांना गर्भवती राहणे कठीण असते.  हर्स्युटिजम (Hirsutism)  हा शब्द चेहरा आणि शरीरावर जास्त  प्रमाणावर होणार्या केसांच्या वाढीसाठी वापरला जातो.  जे पीसीओएसच्या लक्षणांपैकी एक आहे. अँड्रोजनचे जास्त निर्माण, किंवा पुरुष संप्रेरक, याला कारणीभूत ठरतात.

डॉ. बलकवडे पुढे सांगतात की, पीसीओएस नसलेल्या स्त्रियांच्या तुलनेत, पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये नैराश्य/ चिंता:  जास्त पहावयास मिळते. हे  हार्मोनल असंतुलनामुळे आहे,  जे पीसीओएस मध्ये प्रथम स्थानी पहावयास मिळते. या असंतुलनाचा मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे चिंता आणि निराशा येऊ शकते. पीसीओएस शरीराच्या संप्रेरकांवर परिणाम करते आणि इन्सुलिन प्रतिरोधनास प्रोत्साहन देते. परिणामी, जास्त वजन हा पीसीओएसचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. पीसीओएस असलेल्या महिलांचे वजन लवकर वाढते. तर  केस गळणे, पुरळ, त्वचेवर डाग, कोलेस्टेरॉलची जास्त पातळी, थकवा किंवा मानसिक सतर्कतेचा अभाव आणि संभोगेच्छा कमी होणे ही काही इतर लक्षणे आहेत.

पीसीओएस असलेल्या स्त्रिया नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाहीत हा एक सामान्य गैरसमज आहे. पण काही स्त्रिया त्यांच्या नैसर्गिक चक्राच्या परिणामे गर्भवती होतात. दुसरीकडे पीसीओएस असलेल्या गर्भवती महिलांना काही आजार होण्याची शक्यता वाढते. जसे की गर्भपात, गर्भधारणेतील मधुमेह, उच्च रक्तदाब,  वेळेआधी प्रसुति, पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये  अन्य महिलांपेक्षा गर्भपाताचे प्रमाण जास्त असते. ज्याचे अचूक कारण अज्ञात असले तरी, असे दिसून येते की पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये हार्मोनल अनियमिततेने गर्भपात होऊ शकते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading