Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची भेट..

सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील याबद्दल व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी वादाची पार्श्वभूमी राहिली आहे. याच पार्श्वभूमीदरम्यान राज्यपालांनी चक्क शिवसेना उपनेत्यांची भेट घेतली आहे. भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेउन त्यांना “शिवसेना – अस्मिता, संघर्ष, वाटचाल” हे पुस्तक भेट दिले.
पुस्तक हातात पडताच राज्यपाल कोश्यारी ते वाचण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांनी लगेचच दोन पाने वाचली देखील आणि संपुर्ण पुस्तक वाचण्यात रस असल्याचे म्हटले. “गेल्या 50 वर्षातील शिवसेनेचा प्रवास” याचे उत्तम वर्णन पुस्तकातील 21 अध्यायात आहेत.

हिंदुहृदयसंम्राट बाळासाहेबांच्या गूढ व्यक्तिमत्वावर दोघांमध्ये 30 मिनिटांची दीर्घ चर्चा झाली. पूर्वी शिवसेना आणि भाजप युतीला त्यांनी नेहमीच कशी मदत केली, हे सांगितले. सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील याबद्दल त्यांना पूर्ण विश्वास आहे.
शिवसेना कामगार नेते डॉ. रघुनाथ कुचिक हे महाराष्ट्रातील किमान वेतन सल्लागार मंडळाचे (MWAC) अध्यक्ष असल्याने, त्यांनी कोश्यारींना किमान वेतन धोरण, नवीन यंत्रणा आणि अंमलबजावणीबद्दल देखील काही गोष्टी समजून सांगितल्या. त्यांनी असंघटित आणि आयटी क्षेत्रासाठी, त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी विविध कामगार समस्या जोरदारपणे सामायिक केल्या आणि विशेषतः उद्योगातील कामगारांसाठी कोरोनाकाळ किती कठीण आहे हे सांगितले.

शिवसेनेचे कामगार नेते डॉ. कुचिक यांनी शिवसेनेच्या कामगार चळवळीविषयी आणि उद्योगांमध्ये लोकांना दीर्घकाळ मदत कशी करत आहे याबद्दल चर्चा केली. डॉ. कुचिक महाराष्ट्रातील किमान वेतन सल्लागार समितीचे (MWAC) प्रमुख असल्याने, त्यांनी कोश्यारींना किमान वेतन धोरण, नवीन यंत्रणा आणि अंमलबजावणीबद्दल समजावून सांगितले. असंघटित आणि आयटी क्षेत्रासाठी विविध कामगार समस्या आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनाबद्दल माहिती दिली. विशेषतः उद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी कोविड-19 वेळ किती कठीण आहे हे सांगितले. यावेळी प्रफुल सारडा आणि राहुल बोहरा उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading