अॅमेझॉन ने भारतात प्राइम व्हिडियो चॅनल्सची घोषणा केली
पुणे : अॅमेझॉनने आज भारतात प्राइम व्हिडियो चॅनल्सची घोषणा केली. प्राइम व्हिडियो चॅनल्स भारतात २४ सप्टेंबर पासून सुरू होतील. प्राइम व्हिडियो चॅनल्सच्या माध्यमातून प्राइम व्हिडियो सदस्यांना लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचा वैशिष्ट्यपूर्ण कंटेन्टचा अखंडित अनुभव आणि अॅक्सेस मिळणार आहे. विनाअडथळा मनोरंजनाचचा अनुभव, सुलभ शोध व सुरळीत पेमेंट ही ग्राहकांची गरज लक्षात घेत प्राइम व्हिडियो चॅनल्स मध्यस्थ म्हणून काम करतील. या माध्यमातून प्राइम मेंबर्सना लोकप्रिय ओटीटी सर्व्हिसेचे अॅड ऑन सबस्क्रिप्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे आणि हा कंटेन्ट भारतात अॅमेझॉन प्राइम व्हिडियो अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. प्राइम व्हिडियो चॅनलच्या लाँचच्या औचित्याने, भारतातील ग्राहकांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडियो हे सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन ठिकाण करण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल टाकण्यात आले आहे.
लाँचच्या वेळी प्राइम व्हिडियो चॅनल्सवर प्राइम सदस्यांना जागतिक व स्थानिक पातळीवरील खिळवून ठेवणारा कंटेन्ट पाहण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यात डिस्कव्हरी प्लस , लायन्सगेट प्ले, डॉक्युबे, इरॉस नाऊ, मुबि, होइचोइ, मनोरमा मॅक्स आणि शॉर्ट्स टीव्ही या चॅनल्सवरील हजारो शो, चित्रपट, रिअॅलिटी टीव्ही, माहितीपटांचा समावेश आहे. हे सर्व चॅनल्स संबंधित अॅड ऑन सबस्क्रिप्शनसह उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना फक्त त्यांनी निवडलेल्या सर्व्हिसची किंमत भरावी लागेल. लाँचच्या वेळी प्राइम सदस्यांना ओटीटी चॅनल पार्टनर्सनी उपलब्ध करून दिलेल्या खास पदार्पणाच्या वार्षिक सबस्क्रिप्शनचा लाभ घेता येणार आहे.
भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडियोचे कंट्री मॅनेजर गौरव गांधी म्हणाले की . प्राइम व्हिडियो चॅनल्सच्या लाँचसह भारतातील अशा प्रकारचे पहिलीच व्हिडियो मनोरंजन मार्केट तयार करून भारताचे मनोरंजन करण्याच्या आमच्या प्रवासात आम्ही पुढचे मोठे पाऊल टाकले आहे. या माध्यमातून मनोरंजनाचे अधिक पर्याय उपलब्ध होऊन ग्राहक खुश होणार आहेतच, त्याचबरोबर जे ओटीटी चॅनल पार्टनर्स आमच्याशी सहयोग करतील त्यांना प्राइम व्हिडियोचे वितरण, व्याप्ती आणि टेक इन्फ्रास्ट्रक्चर याचा लाभ घेता येणार आहे.
