Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते शरद रणपिसे यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते स्व. आमदार शरद रणपिसे यांचे काल दु:खद निधन झाले. काल रात्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्व. रणपिसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे बंधू राजेंद्र रणपिसे व कुटुंबीयांचे सात्वंन केले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे उपस्थित होते. त्यांना श्रध्दांजली अर्पण करताना नाना पटोले म्हणाले की, ‘‘स्व. शरद रणपिसे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार केला. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. रणपिसे हे अभ्यासू नेते होते. युवक काँग्रेस पासून राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. पुणे महापालिकेत नगरसेवक, दोनवेळा विधानसभा व तीनवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करताना सामान्य माणसांचे प्रश्न हिरीरीने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. काँग्रेस पक्ष संघटनेतही त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.’’

      आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. शरद रणपिसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महाराष्ट्र विधानपरषिदेच्या उपसभापती  डॉ. निलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार माणिकराव ठाकरे, पुण्याचे उपमहापौर  सुनिता वाडेकर,  काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस मोहन प्रकाश, काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय दत्त, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, आमदार संजय जगताप,  बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, ॲड. अभय छाजेड, आबा बागुल, संजय बालगुडे,  विजय अंबुरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटूंबियांनी शोकसंदेश पाठविला.

      कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, दत्तात्रय बहिरट,  डॉ. सिध्दार्थ धेंडे, ज्येष्ठ साहित्यीक अर्जुन डांगळे, नगरसेवक अरविंद शिंदे, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, मनीष आनंद, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, रजनी त्रिभुवन आंबेडकरी चळवळीचे नेते, कार्यकर्ते व पुणे मनपातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading