रविवारी २२० महाविद्यालयात होणार SET परीक्षा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) यांच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी 37 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) रविवारी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे आणि गोवा राज्य अशा एकूण १५ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकूण २२० महाविद्यालयांमध्ये सेट परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ९८ हजार ३६० विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. परीक्षची प्रवेशपत्रे http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सेट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी ०२०- २५६२२४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सेट परीक्षेचे सदस्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
