Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

महाज्योती च्या विद्यार्थ्यांना वेतन दिले नाहीतर भविष्यात ओबीसी विद्याथी आंदोलन करतील -योगेश  टिळेकर

पुणे: मागच्या 2 वर्षात महाविकास आघाडीच्या नियोजनशून्य कारभारामुळे महाज्योतीचे  नुकसान झाले आहे.2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाज्योती  च्या लाभार्थ्यांची निराशा झाली आहे.सारथी आणि बाटी या प्रमाणे महाज्योतिच्या विद्यार्थ्यांना वेतन आणि नामांकित संस्थांकडून अनुदान दिले जावे.जर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना वेतन दिले नाहीतर भविष्यात ओबीसी मोर्चा महाज्योतीचे विद्याथी आंदोलन करतील. असा इशारा पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश  टिळेकर यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला ओबीसी समाजाचे विद्यार्थी कौस्तुभ पिगळे, मनोज पिंगळे ,अरविंद वल्लेकर उपस्थित होते.
योगेश टिळेकर म्हणाले, महाज्योतीचे उद्दिष्ट दाबण्याचं काम आघाडी सरकार करत आहे. सरकारला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही घेणे देणे नाही. अशी टीका टिळेकर यांनी राज्य सरकारवर केली.
ते पुढे म्हणाले,राज्य सरकारच्या  नाकर्तेपणा  मुळे ओबीसी समाजाचे आरक्षन रखडले आहे. इम्पेरेकिल डेटा हा राज्य सरकारच्या ताब्यात आहे. त्यांनी  तो ओबीसी समाजाला लवकरात लवकर घावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकार कडे केली आहे. राज्याचे पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाला आम्ही लवकरात लवकर आरक्षन देऊ असे म्हणतात मला त्यांना विचारयाचे आहे आरक्षन कधी देणार ?असे योगेश टिळेकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading