Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

कॉम्प्यु किलर्स चॅम्पियनशिप 2021 आंतर शालेय संगणक कौशल्य स्पर्धा 18 डिसेंबर रोजी पुण्यात

पुणे: आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ,कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रोटरी क्लब ऑफ पूना मिटडाऊन व युनियन बँक ऑफ इंडिया ,यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय कॉम्प्यु किलर्स चॅम्पियनशिप 18 डिसेंबर 2021 स्पर्धा पुण्यात पार पडणार आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत परमार संस्थेचे चेअरमन सुभाष परमार यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला  प्रकाश परब ,मालिनी कल्याणी वाला, मानसी मारुलकर उपस्थित होते.
सुभाष परमार म्हणाले, सदस्य तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञाना संबंधी स्पर्धेचे आयोजन करून. असा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन .पुणे शहरातील नामांकित शाळा  अशी आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेची ओळख झाली आहे .विद्यार्थ्यांमध्ये आत्म विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्यातून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा म्हणजे या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संगणक विषयक कौशल्याला व सर्जनशीला अधिकाधिक वाव मिळावा यासाठी कॉम्प्यु किलर्स चॅम्पियनशिप 2021 ही स्पर्धा एक उत्कृष्ट माध्यम असून मी सुभाष परमार संस्थेचे चेअरमन या नात्याने सर्व शाळांना आवाहन करत आहे .की विद्यार्थ्यांमध्ये संगणक किंवा मनाला योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करावे. असे सुभाष परमार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading