Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पुणे:राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी सर्व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, डॉ.अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, सुभाष घाटे, राजकुमार घुले, संदिप नाना चिलेकर यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन सादर केले.

यामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती पोट निवडनुका आगामी काळात होत असून होऊ घातलेल्या जणगणणेमध्ये ओबीसी संवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच भारतीय संविधानाच्या कलम २४३ (डी -६) आणि कलम २४३ (टी -६) सुधारणा (अमेंडमेंट ) करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हापरिषद महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत मध्ये ओबीसी संवर्गाला २७% राजकीय आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. असुन मा.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची ५०% मर्यादा रद्द करण्याची घटनेत तरतूद किंवा सुधारणा करावी व संपूर्ण देशातील ओबीसीना न्याय मिळवून द्यावा.अश्या प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदन देते वेळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष चेतन शिंदे , प.महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल पंडित, सचिव संदिप आढाव,युवा उपाध्यक्ष धनंजय वठारकर, युवा कार्याध्यक्ष सचिन काळे, युवा संघटक सागर व्हावळ, विलास साळुंखे,हरिभाऊ काळे,सुवर्णा सावर्डे, संगीता गवळी, रमेश पंडित, अमोल भोसले, सुधीर लोणकर, गोकुळ दळवी आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading