Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या सर्व जागा लढवणार -आनंदराज आंबेडकर

पुणे:  राज्यातील आगामी  महानगरपालिकेच्या व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या सर्व जागा लढवणार अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी दिली.

आनंदराज आंबेडकर आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  2 वर्षापासून शाळा  खाजगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. विद्यार्थी हे घरी बसून वैतागले आहेत. मंदिरे उघण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे सरकारने मंदिरे उघडण्याच्या आधी शाळा चालू कराव्यात. जर सरकारने  शाळा चालू केल्या नाहीत तर रिपब्लिकन विद्यार्थी सेने तर्फे थोड्याच दिवसात राज्य सरकार विरुद्ध राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारने  इंपेरीकल  डेटा च्या नावाखाली ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारने रखडवले आहे. ओबीसीना येणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यायला पाहिजे होते. व ओबीसींची जातगणना सरकारने केली पाहिजे अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading