सेट, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विदयापीठाच्या एमबीए ची परीक्षा एकाच दिवशी
पुणे : विदयापीठ अनुदान आयोगाच्या सेट विभागांतर्गत 26 संप्टेंबर परीक्षा असुन 98 लाख 360 विदयार्थीनी नोंदणी केली. ही परीक्षा 15 शहरामध्ये 239 केंद्रवरती होणार आहे.पण याच दिवशी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क व गट ड संवर्गातील लेखी परीक्षा होणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाची एमबीएची परीक्षा सुद्धा त्याच दिवसी व त्याच वेळेत होणार आहे यामध्ये दोन किंवा तीनही परीक्षांना बसणार्या विदयार्थीची संख्या मोठया प्रमाणात आहे. यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत अडकले आहेत.
या तिन्ही महत्वपुर्ण परीक्षा आहेत. त्यामूळे विद्यार्थ्यांच्या अडचणीचे ठरणारे हे वेळापत्रक शासनाने बदलावे, यातुन विदयापीठाने योग्य मार्ग काढून परीक्षांच्या तारखा बदलाव्यात तसेच आगामी काळात एकाच दिवशी वेगवेगळ्या परीक्षा येऊ नयेत यासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.
