Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल परब यांनी किरीट सोमय्या विरुद्ध दाखल केला 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना माफी मागण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती. 72 तास उलटल्यानंतर सोमय्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे आता अनिल परब यांनी सोमय्यांच्याविरोधात रितसर कायदेशीर पाऊल उचलले आहे.सोमय्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात  उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे’ असं परब यांनी जाहीर केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले आहे. एसटी  महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा  घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading