पतित पावन संघटनेतर्फे सर्वधर्मियांसाठी मोफत लसीकरण
पुणे : पतित पावन संघटना, स्वकुळ साळी समाज युवक संघटना पुणे, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक सेंटर व स्व रूपवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पेठ भागातील सर्वधर्मिय नागरिकांसाठी एक दिवसीय मोफत लसीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. जयंत सूर्यवंशी, बाळासाहेब पाटोळे, रा.स्व.संघ धर्माचार्य संपर्कप्रमुख राजाभाऊ कुलकर्णी, अशोक शिंगाडे, नरेंद्र गायकवाड, नितिन गायकवाड, सुनील गणचारी, राजाभाऊ राजपूत, नितिन एकबोटे, राजाभाऊ पाटील, मनोज नायर, गोकुळ शेलार, संतोष शेंडगे, ललित खंडाळे, निलेश गुणवंते, स्वप्नील नाईक, राजेश एकबोटे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
केंद्रामध्ये २८३ नागरिकांचे लसीकरण झाले. यावेळी स्वकुळ साळी समाजाचे निलेश गुणवंते म्हणाले, पूर्व भागातील गरजू नागरिकांना लसीकरणाचे आॅनलाइन बुकिंग करताना अडचणी येऊ नये व युवकांनी लसीकरणाचे प्रबोधन करावे, या उद्देशाने हे लसीकरण करण्यात आले.
पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले, लसीकरण हेच विघ्नहरण आहे. गेली दोन वर्षे आपण गणेशोत्सव अत्यंत साध्यपणाने साजरा करतोय, पूर्व भागातील अनेक नागरिकांचा पहिला डोस घ्यायचा राहिला होता, त्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. जर आपण लस घेतली तर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रशासनाने लावलेले प्रतिबंध कमी होऊन पुढच्यावर्षी गणेशोत्सव पुन्हा एकदा त्याच जोमाने उत्साहात साजरा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची व्यवस्था स्वकुळ साळी समाज युवक संघटना व पतित पावन चे स्वप्नील नाईक यांनी केली.
