बालेवाडी कोविड सेंटर ला दुसऱ्यादा 6 महिन्याची मुदत वाढ देण्याचा महापालिकेचा निर्णय
पुणे:देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज टास्क फोर्स चे डॉक्टर व्यक्त करत आहेत .याच पाश्चवभूमीवर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम वर उभारलेल्या कोविड सेंटर ला दुसऱ्यांदा 6 महिनेच्याची मुदत वाढ देण्याचा महापौर, महानगरपालिका आयुक्त यांच्या बेठकीत निर्णय घेतला आहे.अशी माहिती स्थायी समिती चे अध्यक्ष हेंमत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हेंमत रासने म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बालेवाडी व शिवाजीनगर येथे जम्बो कोविड सेन्टर महानगरपालिकेने चालू केले.जशी लाट
ओसरू लागली तशी बालेवाडी व शिवाजी नगर येथील कोविड सेंटर हळूहळू बंद केले. कोरोनाचा तिसऱ्या लाटेच्या पाश्चवभूमीवर शिवाजी नगर येथील जम्बो कोविड सेन्टर चालू केले आहे. कोरोनाची साथ जर वाढायाला लागली तर रुग्ण हलविण्याची वेळ येवू नये म्हणून बालेवाडी येथील कोविड सेंटरला 6 महिन्यांची मुदत वाढ देत आहोत.असे रासने म्हणाले.
