माजी मंत्री म्हणू नका वरून चंद्रकांत पाटलांचा ‘यु’टर्न
पुणे: मी एका कार्यक्रमाला गेले होते .तिथे माजी मंत्री बाळासाहेब ढवळे यांना सारखे माजी मंत्री म्हणून बोलले जात होते. मी त्यांचा बद्दल बोललो की माजी मंत्री म्हणून नका लवकरच आजी होतील. असा खुलासा करत दोन काय होतं ते बघा म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाक्यावरून ‘यु’ टर्न घेतला आहे. आज पुण्यात अनंत चतुर्थी निमित्त पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती चे दर्शन घेण्याकरता आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरीचे? हा प्रश्न पडतो. कारण ते पुणे – पिंपरी शिवाय कुठेही फिरले नाहीत असा टोला पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुबंई मधील साकिनाका बलात्कार प्रकरणावरही भाष्य केले, कायदा सगळ्यांसाठी एक असला पाहिजे ते परप्रांती असू की आपला नागरिक असून कायदा सगळ्यांसाठी एकच असला पाहिजे.असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार सेनेच्या संपर्कात अशी चर्चा सगळीकडे पसरली आहे.जाणाऱ्यांनी विचार करावा परतेची वाट बंद आहेत. असे बोलून जे भाजप आमदार शिवसेनेच्या संपर्कात होते. अशी चर्चा होती त्यांना पण खडसावले.
