Wednesday, November 18, 2026
Latest NewsSports

एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एचपी रॉयल्सची जनादेश इंडियावर मात

पुणे : हेमंत पाटील (एचपी) प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत गौतमी नाईकच्या 28 धावांसह प्रज्ञा वीरकर(3-8), पूनम खेमणार(2-11) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने जनादेश इंडिया संघाचा 15 धावांनी पराभव करून विजय मिळवला.

शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना एचपी रॉयल्स संघाने 20षटकात 96धावापर्यंतच मजल मारता आली.यात गौतमी नाईक 28, पूनम खेमणार 19, तेजश्री ननावरे 18 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.जनादेश इंडियाकडून रोहिणी माने(3-17), श्री जीआर(3-16), तेजल हसबनीस(1-15)  यांनी सुरेख गोलंदाजी करत एचपी रॉयल्स संघाला96 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना जनादेश इंडिया संघ 20षटकात 9बाद 81धावाच करू शकला. यात नेहा गुरवने एकाबाजूने लढताना 46 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. एचपी रॉयल्स संघाकडून प्रज्ञा वीरकर(3-8), पूनम खेमणार(2-11), गौतमी नाईक(1-19), सायली लोणकर(1-9) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर प्रज्ञा वीरकर ठरली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एचपी रॉयल्स: 20षटकात सर्वबाद 96धावा(गौतमी नाईक 28(27,2×4), पूनम खेमणार 19, तेजश्री ननावरे 18, रोहिणी माने 3-17, श्री जीआर 3-16, तेजल हसबनीस 1-15) वि.वि.जनादेश इंडिया: 20षटकात 9बाद 81धावा(नेहा गुरव नाबाद 48(46,6×4,2×6), प्रज्ञा वीरकर 3-8, पूनम खेमणार 2-11, गौतमी नाईक 1-19, सायली लोणकर 1-9);सामनावीर-प्रज्ञा वीरकर; एचपी रॉयल्स संघ 15 धावांनी विजयी.

Leave a Reply