एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा विजय

पुणे : हेमंत पाटील (एचपी) प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत शिवाली शिंदेच्या उपयुक्त 43 धावांसह श्रद्धा पोखरकर(2-23 व नाबाद 14धावा) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी एचपी रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना एचपी रॉयल्स संघाने 20षटकात 5बाद 140धावा केल्या. यात वैष्णवी शिंदे 44, पूनम खेमणार 30, गौतमी नाईक नाबाद 19, सायली लोणकर 17 यांनी संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीकडून श्रद्धा पोखरकर(2-23), जान्हवी साळुंखे(2-12) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याच्या उत्तरात हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 19.5षटकात 3बाद 144धावा करून पूर्ण केले. यामध्ये शिवाली शिंदेने 38 चेंडूत 8 चौकरांसह 43 धावांची खेळी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कश्मिरा शिंदे 24, उत्कर्षा पवार 24, साक्षी डोंगरे 22, श्रद्धा पोखरकर नाबाद 14 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी श्रद्धा पोखरकर ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एचपी रॉयल्स: 20षटकात 5बाद 140धावा(वैष्णवी शिंदे 44(44,4×4), पूनम खेमणार 30(31,4×4), गौतमी नाईक नाबाद 19, सायली लोणकर 17, श्रद्धा पोखरकर 2-23, जान्हवी साळुंखे 2-12)पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 19.5षटकात 3बाद 144धावा(शिवाली शिंदे 43(38,8×4), कश्मिरा शिंदे 24(24,3×4), उत्कर्षा पवार 24(14,3×4,1×6), साक्षी डोंगरे 22, श्रद्धा पोखरकर नाबाद 14, प्रियांका कुंभार 1-17);सामनावीर-श्रद्धा पोखरकर; व्हेरॉक संघ 7 गडी राखून विजयी.

Leave a Reply

%d bloggers like this: