Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

पेट्रोल – डिझेल जीएसटी कक्षेत आणण्यास विरोध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: लखनौ येथे पेट्रोल – डिझेल जीएसटी कक्षेत आणण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परिषदेला जाता आले नाही मात्र राज्याचे जीएसटी आयुक्त आणि संबंधित अधिकारी पाठवले आहेत . महाराष्ट्राच्या वतीने चांगले असणारे मुद्दे कळवले आहेत. जवळपास 15 विषय आहेत. पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये  आणण्यास विरोध असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना नगालँड चे राज्यपाल करणार असे विधान केले त्यावर अजित पवार यांनी  भाष्य केले .माहिती नाही. मी  माझं काम करतोय.चंद्रकांतदादा ना राज्यपाल, मंत्री करणार असतील तर नाही माहिती. मी विकासाला महत्व देतोय.आज बहुमत महाविकास आघाडी ला आहे.आज काम होणं गरजेच आहे.त्यामुळे मी सकाळपासून काम करत आहेत. प्रत्येकाला काय बोलायच अधिकार आहे.त्यांना काय बोलायच हे त्यांना माहिती असत.काय काय चांगल्या गोष्टी मी करत असतो, असा टोला अजित पवार यांनी पाटील यांना लगावला.

राज्यपाल भगत सिंह कोशारी सकाळी पुणे दौऱ्यावर होते त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले दादा तुम्ही सकाळी लवकर जरी कार्यक्रमाला हजेरी लावतात तसे  राज्यपालांनी पण लावली .त्यावर पवार म्हणाले. राज्यपाल महामहिम आहेत,त्याचा आधिकार असतो,आम्हाला शपथ घेताना पण मास्क काढा म्हटलं तर काढावे लागेल,त्यांना आधिकार असतात असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading