Pune – गेल्या 24 तासात 171 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 213 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दोनशे च्या आत आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 171नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 213रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99हजार 053इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 88हजार 197इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8994जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1862रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 181रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7891 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
