Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अखिल मंडई मंडळाच्या गणरायाचे विसर्जन रविवारी ६.३० वाजतागज गवाक्ष अमृत कुंभात

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या गणरायाचे विसर्जन यंदा देखील मंदिर परिसरातच होणार आहे. १२८ वर्षाच्या उत्सवाच्या परंपरेत सलग दुसर्य़ा वर्षी साधेपणानेच विसर्जन देखील करण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या गज गवाक्ष अमृत कुंभात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ सप्टेंबर अनंतचतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता गणरायाला निरोप देण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मंदिरातच प्राणप्रतिष्ठापना करुन मंदिर परिसरातच विसर्जन करण्यात येत आहे. भाविकांनी देखील आॅनलाईन माध्यमाने विसर्जन सोहळा अनुभवावा आणि रस्त्यावर गर्दी करु नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading