मार्कोलाईन्स ट्रॅफिक कंट्रोल्स चा आयपीओ  विक्रीसाठी खुला

पुणे : मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड हि कंपनी हायवे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा पुरवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे . मार्कोलाईनसच्या इनशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे ( आयपीओ) च्या विक्रीची सुरुवात १५ सप्टेंबर २०२१ रोजा होणार असून २० सप्टेंबर २०२१ पर्यंत हि विक्री  चालू असणार आहे . बीएसईमध्ये देण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुसार प्रत्येकी रुपये ७८/- मूल्यांच्या एकूण ५१,२८,००० समभागांची विक्री करण्यात येणार असून समभागांचे मूल्य एकूण रु. ३,९९९,८४ लाख इतके असणार आहे . कंपनीद्वारे करण्यात येणाऱ्या एकूण समभागांच्या विक्रीपैकी २४,३५,२०० समभागांची विक्री रिटेल इंडिविज्युअल गुंतवणूकदार आणि २४,३५,२०० समभाग नॉन रिटेल गुंतवणूकादारांसाठी राखीव  असणार आहेत .

इश्यूजचे लीड व्यवस्थापन “ग्रेटेक्स र्कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ” ह्यांच्याकडे आहे . ह्या  इश्यूजच्या विक्रीमधून मिळणाऱ्या पैशांमधील जास्तीत जास्त हिस्सा कंपनीचे कार्यामधील भांडवल म्हणून वापरण्यात येणार असून त्यांच्या चालू कार्यामधील एकूण भांडवलासाठी वापर करण्यात येणार आहे . हि विक्री पूर्ण झाल्यानंतर वर्धित भांडवलाच्या सह कंपनीला शाश्वत वाढ आणि त्यांच्या विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे .  मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल लिमिटेड च्या कंपनीने व्यवसायाची सुरुवात २००२ मध्ये रोड  मार्किग पासून सुरुवात केली. त्यांनतर २००९ मध्ये महामार्ग प्रकल्पांच्या प्रचालन आणि देखभाल करण्याची संधी त्यांना मिळाली .

मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड चे सीएफओ विजय ओसवाल म्हणाले कि सरकारी धोरणे हि खाजकीकरणाचा मार्ग मोकळा करणारी आहेत , महामार्ग निर्मितीमध्ये असलेल्या कंपन्यांना त्यांच्या  प्रमुख व्यवसायावरच लक्ष्य केंद्रित करायचे असते म्हणून  मार्कोलाईन्सने सदरची संधी ओळखून रस्ते बांधणाऱ्या कंपन्यांचे महामार्ग प्रचालन आणि देखभालीचे काम स्वीकारली  आहेत  त्यामुळे  मार्कोलाईन्सच्या व्यवसायाच्या वाढीसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे . भारत हा महामार्गाचे जाळे असणारा जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे , आणि ६. २१ दश लक्ष किलो मीटर्सच्या महामार्गाचे जाळे आहे आणि त्यामध्ये रोज वाढ होत आहे .मार्कोलाईन्स हि आजच्या घडीला अग्रगण्य कंपनी आहे आणि या कंपनीची शंका पाहता आगामी वर्षांमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याची उत्तम संधी आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: