अभियंता दिन विशेष – करमाळा तालुक्यातील अभियंत्याचा हरियाणा मध्ये प्रकल्प

वडीलांचे शिक्षण बारावी… त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय… पुण्यातील बालेवाडी स्टेडिअमचे काम सुरु असताना वडिलांचे काम जवळून पहिले. तेव्हाच मनाचा निर्णय झाला आपणही इंजिनिअरच व्हायचे! निश्चय झाला आणि ते कामाला लागले. हरियाणात त्यांचा पानिपत येथे एक मोठा प्रकल्प सुरु आहे. जिद्द आणि चिकाटी यामुळे विश्वास संपादन करत त्यांची प्रगती झाली. राजकारणातही ते सक्रीय असतात. ती व्यक्ती आहे उद्योजक शशिकांत घोडके!

घोडके यांचे मुळगाव करमाळा तालुक्यातील आळजापूर! करमाळा- जामखेड रस्त्यावर सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे छोटेसे गाव आहे. सीना नदीच्या काठावर हे गाव असलं तरी निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाचा अनिश्चितपणा यामुळे सतत या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. यातून अनेक कुटुंब कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेली आहेत.

शशिकांत घोडके यांचे प्राथमिक शिक्षण आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात  बालेवाडी येथे झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांनी 2000 ते 2002 civil Construction Diploma Sharada Institute Pune येथे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी 2003 ते 2005 दरम्यान नोकरी केली. (Delhi Central Government Job). २००५ ते २०१० तरटे आणि कंपनी (पुणे) येथे नोकरी केली. २०१० मध्ये त्यांनी सुयश एन्टरप्राजेस नावाने (बांधकाम व्यवसायिक) कंपनी सुरु केली. त्यातून त्यांनी कामे सुरु केली. त्यांचे वडील तुळशीदास यांचे १२ वीपर्यंतचे शिक्षण कर्जत- जामखेडमध्ये झाले. आई रुक्मिणी या पुण्यात इंग्रजीच्या शिक्षिका, भाऊ रजनीकांतचे रजनीकांत आदित्य सर्व्हिस सेंटर आहे. तर बहीण संध्या ही बारामती येथे अंगणवाडीसेविका आहे. पत्नी स्वाती घोडके यांचा प्रगतीत मोठा वाटा आहे.

आपल्या प्रवासाबद्दल सांगताना शशिकांत घोडके म्हणाले की, वडील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्याने मीही याच व्यवसायात आलो. १९९५ ला बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरीचे काम आम्हाला मिळाले होते. ते काम मी जवळून पहिले. शिक्षण सुरु असताना वडिलांना मदत म्हणून नेहमी साईटवर जात. बालेवाडी, बावधन, पाषाणसह हरियाणात पानिपत येथे त्यांचा सद्या एक प्रकल्प सुरु आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या कामाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी मनसेच्या विविध पदांवर काम पहिले. सध्या ते मनसेमध्ये  सक्रियपणे कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांचे सामाजिक काम सुरु होते. त्याच्या कामाची दखल आळजापूर येथील अशोका फाऊडेशनने घेतली होती. त्यांचे पुण्यातही विविध प्रकारे सामाजिक काम सुरु आहे.

वडिलांचे मित्र पुण्यात नोकरी करत होते. त्यात बी. जी. शिर्के यांच्याकडे नोकरी करत होते. त्यामुळे ते पुण्यात नोकरीनिमित्ताने आले आणि एक वर्ष नोकरी करत असताना छोटी मोठी स्टेडियममधील कामे घेवू लागले.

Leave a Reply

%d bloggers like this: