शहरात मेट्रो हवीच आहे, मात्र आपल्या परंपरा मोडून नाही – आबा बागुल

पुणे: पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणजे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक. या मिरवणुका दीर्घकाळा पासून लक्ष्मी रोड ,टिळक रोड ,केळकर रोड, लाल बहादुर शास्त्री रोड वरून वाजत-गाजत जातात. नंतर लकडी पुलावर संपतात. परंतु, मेट्रो पुलामुळे या विसर्जन मिरवणूकीच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाला आहे.   शहरात कोणत्याही परिस्थितीत मेट्रो हवीच आहे. मात्र, पुण्याचे पुणेरीपण जपणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोडीत काढू नये, अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली.

या पत्रकार परिषदेला आर्किटेक आयटीयन्स अतुल राजवाडे  व त्यांचे सहकारी उपस्थित होते. बागूल म्हणाले, आर्किटेक अतुल राजवाडे व त्यांच्या टीमने नवीन तंत्रज्ञान विकसीत करून एक नवीन पर्याय सुचवला आहे. यामुळे पुणे शहराच्या परंपरेला बाधा न येता मेट्रो प्रकल्प सुरू राहील. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यास कोणती बाधा येणार नाही. त्यामुळे शहरातील विकास होईल व पुण्याची परंपरा कायम राहील, असे आबा बागुल म्हणाले. 

नवा पर्याय

गटनेते आबा बागुल यांनी आर्किटेक आयटीयन्स अतुल राजवाडे व सहकाऱ्यांच्या मदतीने महानगरपालिकेसमोर एक नवा पर्याय सादर केला आहे. यामध्ये लकडी पुलावरून मेट्रो जातात. त्यामुळे याठीकाणी मॅटर पुलाची उंची साधारण वीस फूट इतकी असल्याने आपण सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण करत आहे. ‘काउंटर वेट मेक द नेम ऑफ वॉटर टँक’ या तंत्राने फुटांपर्यंत उंची वाढवणे शक्य होईल विसर्जन मिरवणूक झाल्यावर पूर्ववत करता येईल. पुलाचे वजन 100 टन असून 25 हजार 904 काउंटर वेट वॉटर सायन्समध्ये निवड करण्यात येणार असून याकरिता तीन एकर जमिनीचा वापर करण्यात येणार आहे.  त्यासाठी साधारण आठ ते दहा कोटी रुपये खर्च येणार आहे.

या तंत्रासाठी उभारण्यात येणाऱ्या गॅलरी सोलर पॅनल येणाऱ्या उत्पन्नातून काही वर्षांत खर्च निघेल कायम उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होईल. हे तंत्रज्ञान भारतातील पहिले असणार असून त्यामुळे पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे .पुल उचलण्यासाठी 4 काउंटर वेट टाक्यामध्ये मध्ये पाणी भरल्यास कोणाशी 25 फूट वाढेल पाणी सोडून दिल्यास पूर्ववत होईल. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका त्या पुलाकडून ट्रॅक्टर ट्रॉली देखावे 40 फुटापर्यंत तरी गेले तरी तर निघून जाईल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: