डेव्हिस कपसाठी सुंदर अय्यर यांची भारतीय संघाच्या समन्वयकपदी निवड 

पुणे :  इस्पो, फिनलँड येथे होणाऱ्या डेव्हिस कप स्पर्धेत फिनलँड विरुद्ध भारत यांच्यात लढत होणार असून यासाठी पुण्याचे टेनिस संघटक सुंदर अय्यर यांची भारतीय संघाच्या समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.   
 
गतवर्षी कोरोनामुळे डेव्हिस कप जागतिक गट 1 मधील फिनलँडविरुद्धची लढत ही पुढे ढकलण्यात आली होती. आता हि लढत एस्पो येथे 17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.  
 
तसेच, या लढतीसाठी भारतीय संघात प्रजनेश गुणनेश्वरन, रामकुमार रामनाथन, साकेत मायनेनी, रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांचा समावेश असून कर्णधार म्हणून रोहित राजपाल(न खेळणारा) आणि झीशान अली हे प्रशिक्षक असणार आहेत. तर याचबरोबर अखिल भारतीय टेनिस संघटनेचे मानद सचिव अनिल धुपर देखील असणार आहेत.
 
सुंदर अय्यर हे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव असून अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिवदेखील आहेत. तसेच अय्यर हे कझाकस्थान व क्रोएशिया येथे झालेल्या डेव्हिस कप संघाचेदेखील भाग होते.  
 


Leave a Reply

%d bloggers like this: