प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी – संगिता तिवारी

पुणे : काल प्रवीण दरेकर ह्यांनी एकदम खालच्या भाषेत महिलां वर टीका केली आहे, त्यातून त्यांच्या विकृत मानसिकते चे दर्शन होते, ह्या भाजपा च्या नेत्यांना आपल्या मातृशक्ति बद्दल असे घाणेरडे बोलायचा कोणी हक्क दिलाय हो, प्रविण दरेकरांनी सर्व महिलांची जाहीर माफी मागावी अशी मागणी  महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव संगीता तिवारी यांनी केली आहे.

तिवारी म्हणाल्या की, दरेकर तुमचे भाषण फक्त पक्षा पुरते ठेवा,  तुमच्या राजकारणात तुम्ही  तुमच्या प्रसिद्धि साठी तुम्ही महिलांच्या वर घाणेरडी टिप्पणी केलेली अजिबात खपवून घेण्यात येणार नाही,  ह्या भाजपा नेत्यांच्या राजकीय टीका करतांना त्यांच्या भाषेतला हरवत असलेला  सुसंस्कृतपणा .पुरोगामी आणि महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही. आणि तो खपवून ही घेतल्या जाणार नाही,      

महाराष्ट्रातील मातृशक्तिला तुम्ही अनादराने जऱ वागवाल तर ह्या जिजाऊ – सावित्री,  माता रमाईच्या लेकी  तुम्हाला महाराष्ट्रा मध्ये  पळता भुई थोड़ी करतील आणि ठीकठिकाणी पायताणाने हाणतील, तुमच्या सारख्या दुर्योधन आणि दुःशासना ला सरळ करणारे  श्रीकृष्ण  पण महाराष्ट्रात आहेत बरे, आणि आई जिजाऊ, आई सावित्री ,आई रमाई ची लेकरे तुला संस्कार शिकवतील.

Leave a Reply

%d bloggers like this: