Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसी आरक्षण : भाजप आक्रमक, उद्या हजार ठिकाणी करणार आंदोलन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ओबीसी आरक्षण गेले ,यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे’, असे सांगून राज्य सारकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ओबीसी आरक्षणासाठी उद्या (15 सप्टेंबर) राज्यात भाजपाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तब्बल एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

बावनकुळे म्हणाले, ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील शुक्राचार्य जबाबदार आहेत. ओबीसींना आरक्षण मिळाले नाही यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे.  काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचे सांगितले. शेवटी ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारच्या विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन  करणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading