Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात 107 नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 107नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 239रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98हजार 290 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87हजार 404इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8991जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1905रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 205रुग्ण गंभीर आहेत.  आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5603 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading