मुंबई निर्भया प्रकरण : आरोपी विरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल – मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबई : मुंबई निर्भया प्रकरणातील पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने इतर गुन्ह्यांसह शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा देखील आरोपीवर दाखल केला असल्याची  माहिती आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. तसेच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

मुंबई येथील साकीनाका परिसरातील निर्भया प्रकरणी पुढील तपासाची माहिती देण्यासाठी आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. नराळे म्हणाले, पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी, एसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपी हा 21 तारखेपर्यंत कस्टडीत असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे.  घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केल आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत, असं नगराळे यांनी सांगितलं.

नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: