भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

अहमदाबाद : गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे  अनेक नेते ऊयापस्थित होते. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपत विधी कधी होणार याबबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पहिल्यांदाच आमदार अन् मुख्यमंत्रीही 

भूपेंद्र पटेल हे 59 वर्षाचे असून ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. व्यवसायाने ते  बिल्डर असून पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात. पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही. पण आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मुख्यमंत्री पद भूषावण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याचे स्पष्ट आहे.

पंतप्रधानांकडून शुभेच्छा 

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा, असे म्हटंले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: