बार्टीला 91.50 कोटींचा निधी तातडीने वितरित; अनेक योजना होत्या बंद

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आजच 91.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टी  मधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.  

बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण 91.50 कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

दरम्यान,  बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, उलट सर्व योजना अधिक व्यापक करण्यासाच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत, असा निर्वाळा देखील धनंजय मुंडे यांनी दिला. 

दरम्यान बार्टीला कोविडच्या आर्थिक संकटात देखील तातडीने 91.50 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90 % पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याबाबतची योजना बार्टी मार्फत सुरू केली असून, या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू आहे. याचप्रमाणे आणखी काही नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या तर काही योजना प्रस्तावित असून कोणत्याही योजनेच्या निधीला धक्का लागणार नाही व कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

 
या निर्णयाचे स्वागत विदयार्थी व समाजातील एकजूटीचा विजय आहे.ही रक्कम तातडीने बार्टी देउन बंद कोर्सस सुरु करावेत.आणी या संदर्भात सर्व विभागाचे समाजिक लेखापरीक्षण न्यायमंञी धनंजय मुंडे यांनी करावे. – कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड

Leave a Reply

%d bloggers like this: