मुंबई निर्भया प्रकरण : पीडितेचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईतील निर्भया प्रकरणातील पीडितेचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमानुष अत्याचार झाल्यानंतर अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक व चिंताजनक होती. मात्र तीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली अन् शेवटी आज (दि.11) या पीडितेचा मृत्यू झाला आहे. बलात्कारानंतर आरोपी मोहन चौहान यांनी या पीडिटेच्या गुप्तांगावर वार आणि त्यानंतर चाकू हल्ला केला होता. त्यामुळे आता या नाराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

पुणे शहरातील सामूहिक बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. मुंबईतील साकीनाका परिसरात खैरानी रोड येथे  एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) ही घटना घडली होती. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकण्याचा अमानुष कृत्य केले तसेच त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला देखील केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मोहन चौहान याला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सदर घटनेतील पीडितेचा मृत्यू झाल्याने आता या आरोपींवर बलात्कार, अमानुष अत्याचार व खून या प्रकरणातील कलम लावण्यात येणार आहेत.

सदर घटना ही दहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कारासारखी आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातील महिलांचा अंत बघू नका

“ज्या राक्षसी पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेत ते सांगण्यासाठी शब्द नाहित. कायद्याची भीती आरोपींना राहिलेली नाही. तिच्या गुप्तां गावर वार केले गेले. तिची आतडी आतपर्यंत कापली गेली. महिलांची सहनशक्ती आता संपली आहे. महाराष्ट्रातील महिलांचा अंत बघू नका. या प्रकारात गुन्हे दाखल होत नाहीत. झाले तर त्यांना शिक्षा होत नाही.  शक्ती कायदे आणणार होते त्याच काय झालं. वूमन अॅ रोसिटी कायदा लागू करून अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी.”

– चित्रा वाघ (महिला प्रदेश अध्यक्षा, भाजपा)

 

Leave a Reply

%d bloggers like this: