पंतप्रधानांकडून गणेशभक्तांना खास मराठीतून शुभेच्छा, म्हणाले “गणपती बाप्पा मोरया!”

मुंबई : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी भारतासह जगभरात अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते आहे. तर पुढील 10 दिवस गणेशोत्सव म्हणून सगळीकडे साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून गणेश भक्तांना या आनंद द्विगुणिक करणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा खास मराठीतून दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंले आहे की, “आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”

पंतप्रधानांसोबतच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: