Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लालबागचा राजा मंडपात पोलिसांची पत्रकारांना अरेरावी

मुंबई : लालबागचा राजा मंडपाबाहेर नेहमीच वादविवाद होत असतात. आज गणपतीचं कव्हरेज करायला गेलेल्या माध्यम प्रतिनिधिंसोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली.

लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकारांना चार दिवसांपूर्वीच पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. मात्र PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading