ससून रुग्णालय – नर्सच्या गणवेशात महिलेने केले 3 महिन्याच्या बाळाचे अपहरण

पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेकडील एका तीन महिन्याच्या मुलीला नर्सचा गणवेश घालणाऱ्या महिलेने गुरुवारी ( दि. 9) पळवून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगवान हालचाली करून खराडी रस्त्यावर या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप मातेकडे सोपवले. मूल होत नसल्याने या महिलेने बाळाला पळवून नेले होते, अशी माहिती प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाली.

एकंदर घटनेने ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

वंदना मल्हारी जेठे (वय 24, रा. थिटे वस्ती, खराडी) हिला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कासेवाडी येथे राहणाऱ्या एका 22 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. ही महिला तिच्या श्‍वेता या तीन महिन्याच्या मुलीसमवेत गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ससून रुग्णालयात आल्या होत्या.

ससूनमधील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये त्या थांबल्या होत्या. त्यावेळी परिचारिकेसारखा गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने या महिलेला तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे संगितले. ती महिला परिचारिका असल्याचे समजून चिमुरड्या श्‍वेताला तिच्याकडे विश्‍वासाने सोपवून ती माता कोण नातेवाईक आले आहेत हे पहायला गेली. त्यांनी आजूबाजूला पहिले, पण कोणी नातलग दिसले नाही.

त्यामुळे त्या लगेच परत वॉर्डमध्ये आल्या; तर ती परिचारिका व तिची मुलगी जागेवर नसल्याचे आढळून आले. काहीतरी अघटित घडले असल्याची जाणीव तिला झाली आणि या मातेने हंबरडा फोडला. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक तेथे धावले. तिने घडलेली हकीकत त्यांना सांगितली. त्यासरशी वेळ न दवडता रुग्णालयीन प्रशासनाने स्थानिक बंडगार्डन पोलीस ठाण्यात ही बाब कळवली

Leave a Reply

%d bloggers like this: