Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात 200 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 123 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशे  रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 200नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 123रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97हजार 612 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86हजार 641इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 9रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8965जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2226रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 213रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8865 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading