मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील


पुणे: मराठा क्रांती मोर्चातील 109 खटले मागे घेतले आणि राहिलेले खटल्या साठी काम चालू आहे मराठा क्रांती मोर्चा च्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत त्याचे  गुन्हे मागे घेणार असे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते.  याप्रसंगी  पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षमंगेश कोळपकर , सचिव सुजित तांबडे, पोलिस आयुक्त आमिताभ गुप्ता उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, होमगार्ड साठी विशेष लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार .कोविडची लागण ही पोलिसांना जास्त होत होती.त्यामुळे आमचा पाहिला प्रयत्न पोलिसांना लवकरात लवकर 2 डोस देण्याचा प्रयत्न आहे. 
राज्यात महिलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण वाढत आहे म्हणून महिला सुरक्षा गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी शक्ती कायदा महाराष्ट्र विधानसभेत विधेयक मधून मंजूर करणार आहोत. बलात्कार संदर्भात चुकीच्या वागणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असून त्यासाठी सकाळी पोलिसांची त्यासाठी चर्चा झाली आहे . गुन्हे करणार्‍या नराधमांना मी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. असे ही वळसे-पाटील म्हणाले.

राज्यात सायबर गुन्हे वाढत आहेत  यासाठी 45 लॅब तयार असून ते  लवकरात लवकर अस्तित्वात आणणार आहोत यामुळे गुन्ह्याची उकल होईल. तसेच पिंपरी चिंचवड येथे सायबर ब्रँच करण्यात येणार असून जिथे गरज तिथे सायबर ब्रँच करण्यात येईल. असेही पाटील म्हणाले.

नितेश राणे व नीलम राणे यांच्यासंदर्भात संस्थेची कर्जाची रक्कम थकबाकी राहिली असून ती केस केंद्रीय गृहखात्याकडे गेली असता ती राज्य गृहखात्याकडे देण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तो तपास लागेल असे पाटील यांनी सांगितले. 
जरांडेश्वर कारखाना हा विषय बँकेचा आहे . त्यामुळे त्याचा तपशील काढणे हा कुणालाही अधिकार नाही बँकेच्या कर्जाबाबत बँकांनी तपशील जाहीर करावा की नाही ही बाब वैद्य नाही . असे बोलून त्यांनी जरंडेश्वर कारखानाचा विषय बँकेच्या अख्यातरीत असून तपशील देणं बँकेवर बंधनकारक नाही असे ही पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: