Pune – गेल्या 24 तासात   257नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 257नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 242रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97हजार 412 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86हजार 298इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 9रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8962जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2152रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 212रुग्ण गंभीर आहेत.  आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 10698 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: