फिजिओथेरपी दिनानिमित्त आरोग्य प्रात्यक्षिक

पुणे : महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर संचालित एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आरोग्य प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते .हा उपक्रम 8 सप्टेंबर रोजी आझम कँम्पस येथे पार पडला. महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा इनामदार तसेच डॉ.आरिफ मेमन , डॉ.नाझीम शेख यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. प्राचार्य डॉ रोनिका अगरवाल,डॉ. गौरी वाकडे, डॉ. ऐश्वर्या रणभोर, डॉ सनत कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिकांमध्ये मार्गदर्शन केले.कोविड साथीच्या मध्ये आरोग्य सांभाळताना फिजीओथेरपीचा कसा उपयोग होतो, याबद्दल माहिती देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: