Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सुजलाम, सुफलाम बरोबर आरोग्यवर्धम ही संज्ञा रुढ व्हावी -डाॅ.अविनाश भोंडवे

पुणेः-  भारताला कृषी, शिक्षण, अध्यात्म, तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रात मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. तीच समृद्ध परंपरेचा वारसा लक्षात घेऊन सुजलाम, सुफलाम बरोबर आरोग्यवर्धम ही संज्ञा रुढ व्हावी असे मत  लेखन,माध्यमांद्वारे कोरोना विषयक उपयुक्त माहिती देणारे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डाॅ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्कराव आव्हाड यांच्या स्मृतिदिना निमित्त देण्यात येणा-या अॅड.भास्करराव आव्हाड पुरस्काराने आज  डाॅ.अविनाश भोंडवे यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती  डाॅ.पी.डी.पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आडकर फाैंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, ज्येष्ठ विधिज्ञ लेखक डाॅ. अॅड. सुधाकरराव आव्हाड,  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. अविनाश आव्हाड उपस्थित होते.
डाॅ.अविनाश भोंडवे म्हणाले, मला आज ज्या कार्यासाठी सन्मानित केले जात आहे ते मी डाॅक्टर या नात्याने कर्तव्यच मानतो. माझ्या हातून हे कार्य झाले. मुळात कोरोना हे महामारिचे संकट सर्वांनाच नवीन होते. आम्हांला देखील रोज जागतीक आरोग्य संघठनेकडून रोज अद्ययावत माहिती येत होती. त्यामुळे सुरवातीला सर्वच स्तरावर गोंधळाचे वातावरण होते. वैद्यकीय माहिती ही किचकट स्वरुपात येत असल्याने त्याचे सुलभीकरण करुन समाजात पसरलेली भिती आणि अस्वस्था कशी कमी करता येईल या दृष्टीने मी लिहीत गेलो आणि प्रबोधन करीत गेलो सुशिक्षीतांमध्ये देखील आरोग्याविषयीच अज्ञान पाहून आरोग्य क्षेत्रात अजूनही आपणांस बराच मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात आले. बालमृत्यू, गरोदर महिलांचे आरोग्याचे प्रश्न तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतचे प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य साक्षरता वाढविणे आवश्यक आहे.
उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले आणि आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading