‘वयम्’द्वारे रोमांचक स्पर्धांसह आभासी गणेशोत्सवाचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्राचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. अनेक मंडळे आणि सोसायट्या कोरोनाचे निर्बंध कायम असल्यामुळे उत्सवाच्या आयोजनाबद्दल चिंतित आहेत. दरम्यान व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोद्वारे निर्मित ‘वयम्’ या मेक इन इंडिया अॅपने गणेश मंडळाची ही चिंता दूर केली आहे.

‘वयम्’ने आभासी गणेश चतुर्थी उत्सव आयोजित केला असून या माध्यमातून गणेश भक्तांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पूजा अनुभव सुनिश्चित करण्यात आला आहे. याद्वारे गणेशोत्सव मंडळे, गुरुजी (पंडित) तसेच निवासी सोसायटी आदींना आपल्या उत्सवाचे आयोजन वास्तविक जीवनातील अनुभवाप्रमाणे साजरे करता येणार आहे. आरती असो वा ढोल-ताशा अथवा सोसायटींद्वारे आयोजित विविध स्पर्धा या सर्वांसाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे

‘वयम्’द्वारे सर्वात सुशोभित मंडप, सर्वाधिक ऑनलाइन सहभागी असलेला सर्वात लोकप्रिय उत्सव आणि प्लॅटफॉर्मच्या सर्वोच्च वापरावर आधारित सर्वात आकर्षक व्हर्च्युअल मंडप अशा तीन श्रेणीत घेतली जाणारी गणेश उत्सव स्पर्धादेखील यादरम्यान आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ५,००,००० रुपयांचे बक्षीस प्रदान केले जाईल.

‘वयम्’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव त्रिपाठी म्हणाले, आम्ही सर्वांना शांततापूर्ण आणि समृद्ध गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की भगवान गणेश आपल्याला समृद्धी, प्रेम आणि आनंदाने आशीर्वाद देतील. वयम् वापरकर्त्यांना सुरक्षा सुनिश्चित करताना एक प्रकारचा आभासी उत्सवाचा अनुभव प्रदान करण्याच्या मोहिमेवर आहे. या गणेश चतुर्थीला आमचे वापरकर्ते कोणत्याही अडथळ्याविना भव्य महोत्सवात सहभागी होऊ शकतील.”

आभासी गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी विविध सोसायटी आणि गणेश मंडळे यांना +९१ ८३८३९६२८१४ व्हॉट्सअॅपवर नंबरवर मेसेजद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून व्हॉट्सअॅप बॉट वापरकर्त्यांना होस्ट करण्यासाठी आपोआप एक इव्हेंट पेज तयार करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: