संजय राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही – जगदीश मुळीक

पुणे: मागील 15 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बदल जे  अपशब्द वापरले होते त्यामुळे नारायण राणे यांना अटक पण झाली होती.त्यामुळे राजकारण चांगले तापले . काल पण असाच प्रकार घडला
काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात तर आम्ही कोथळा बाहेर काढू असं विधान केलं होतं त्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय वादग्रस्त विधानाबाबत केंद्रीय मंञी नारायण राणे यांना अटक होते मग राऊत यांना वेगळा न्याय का?  असा सवाल भाजपने विचारलाय, जोपर्यंत राऊतांवर कारवाई होत नाही  व ते माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलाय.

त्यांनी राऊतांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी  जगदीश मुळीक यांनी  केली. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: