बेळगाव महापालिकेवर कमळ फुललं; महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे. भाजप ने तब्बल आठ वर्षानंतर महापालिकेवर विजय मिळवला. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा मिळविण्यात यश आले.  या निवडणुकीत भाजपनं 35, काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. 

दरम्यान, या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. “येथील मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव, अशी आशा आम्ही करतो,” असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला अन् निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: