स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेतल्यास कोर्टात जाणार – रेखा ठाकूर

पुणे: आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत त्या घटनेच्या नियमानुसार कार्यकाल संपला की लगेच  निवडणूका घ्याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली. निवडणूक आयोगाने ही बाब टाळल्यास कोर्टाकडे जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळेस दिली
ओबीसी आरक्षण संदर्भात इमपीरियल डेटा साठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. संविधानाला डावलून मराठा आरक्षणाची जी स्थिती झाली, असून तीच पद्धत ओबीसी आरक्षणाबाबतीत देखील लावली आहे असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका कार्यकाल संपता न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात स्वबळावर लढणार असल्याची माहिती देखील त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी वंचित चे मूनवर कुरेशी, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, प्रियादर्शी तेलंग उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: