तृतीय पंथ्यांना सर्वोच्च न्यायालयाने समान हक्क दिल्याबद्दल प्रथमच काँग्रेस भवन येथे इंद्रधनुषी रंगीय झेंडा फडकविण्यात आला.

पुणे : मा. सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ मधील जाचक तरतूदी रद्दबातल करून LGBTQ (एलजीबिटीक्यूए) वर्गाला समान मानवी हक्क प्रदान केल्याच्या ऐतिहासिक निर्णायाला आज ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रोफेशनल्स काँग्रेस महाराष्ट्र यांच्या तर्फे आज दि. ६ सप्टेंबर २०२१ काँग्रेस भवन येथे इंद्रधनुषी रंगीय झेंडा फडकवला गेला.

अशा कार्यक्रमाचे आयोजन सर्वप्रथमच पुण्यातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आहेसदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपले मनोगत व्‍यक्त करताना ते म्हणाले की, ‘‘सर्वोच्च न्यायालय कोर्टाचा हा निर्णय राज्यघटनेतील समानतेच्या तत्वाला अधोरेखित करणारा आहे. या निर्णयामुळे आज तृतीय पंथाना समाजामध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याची अत्यंत गरज आहेकाँग्रेस पक्षाने नेहमी सर्व घटकांना समाविष्ट करून घेवून देशाचे नेतृत्व केले.’’

प्रोफेशनल्स काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष  मॅथ्यू अँटनी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहेदेशात काँग्रेस पक्षानेच तृतीय पंथी समाजाला मानाचे स्थान दिलेले आहेतृतीय पंथीयांच्या विकासासाठी सरकारकडे त्यांच्यासाठी वेगळा आयोग स्थापन करण्यासाठी मागणी करणार.’’

प्रोफेशनल्स काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुमेध गायकवड यांनी समाजिक मानसिकतेत येऊ घातलेल्या बदलांची ही नांदी असल्याचे सांगितले. तसेच सचिव श्रीमती जारा परवाल यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाला पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यररविंद्र म्हसकरमहाराष्ट्र काँग्रेसच्या शानी नौशादप्रोफेशनल्स काँग्रेसच्या लेखा नायरमिलिंद गवंडीविक्रम देशमुखश्याम कोन्नूरफ्रान्सिस डिकोस्टामारीओ देपेन्हाविशाखा राऊत यशराज पारखी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेशनल्स काँग्रेस एलजीबिटीक्यू समितीचे श्रीराम यांनी केले.  याप्रसंगी उपस्थिती तृतीयपंथीयांना मान्यवरांच्या हस्ते मिस्ट‘ संस्थेतर्फे प्रायोजित राशन किटचे वाटप करण्यात आले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: