वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी फिरते पुस्तक घर-चंद्रकांत पाटील

पुणे:लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात वाचन संस्कृतीला चालना मिळाली. आता ही संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोथरूडकरांसाठी पुस्तकघर उपक्रम सुरू करत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि फ्लिपगार्ड कंपनीच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी फिरते पुस्तक घर उपलब्ध करुन देण्यात आले. याच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, प्रशांत हरसुले, डॉ. संदीप बुटाला, चिटणीस अनिता तलाठी, अभिजीत राऊत, युवा सुराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, धनराज शिंदे, फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी,  गिरीश भेलके, दिनेश माथवड, विठ्ठल अण्णा बराटे,  दुष्यंत मोहोळ, हर्षदा फरांदे, रमेश चव्हाण, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, स्वप्नाली सायकर, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणावर, मिताली सावळेकर, सेवा प्रकोष्टच्या उल्का मोकासदार, नवनाथ जाधव, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, अजय मारणे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात थांबावे लागल्याने वाचन संस्कृतीला नव्याने गती मिळाली. आता ही वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गतच कोथरुडकरांसाठी फिरते पुस्तक घर सुरु केले आहे. आता हे पुस्तक घर कोथरूड मध्ये सर्वत्र फिरणार असून, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, समाज उपयोगी कामे मार्गी लावण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर फंडाची मदत घेणे शक्य आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एक व्यक्ती एक कंपनी असे, या तत्वाने काम केल्यास, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविता येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी म्हणाले की, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी पुस्तक घर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना कंपनीचे नेहमीच सहकार्य असेल.

Leave a Reply

%d bloggers like this: