आम्ही शेतकऱ्यांवर पिके फेकून देण्याची वेळ आणली नाही – शरद पवार

जुन्नर : आम्ही कृषिमंत्री असताना कधी शेतकऱ्यांना पिके फेकून देण्याची वेळ आणली नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जुन्नर येथे केले.

जुन्नर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कृषी आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.

कोरोनाच्या संकटात लोकांना एकत्र करणे टाळले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत. पण, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं, असेही पवार म्हणाले आहेत. तसेच, कार्यकर्त्याना गर्दी न करण्याचा सल्ला देखील पवार यांनी या मेळाव्या प्रसंगी दिला.

यावेळी पवार म्हणाले की, आपल्याकडे केंद्रीय कृषी खाते होतं पण त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे. मात्र, आता साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा भाव देता येईल’ असंही पवार म्हणाले.

जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान यासोबत येथील भाजीपाला खराब होऊन नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकऱ्यांना या नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला. आजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: