fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील ५१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला अंकुर गणेशा

पुणे : आपल्या हाताने शाडूमातीचा बाप्पा साकारत आणि त्यामध्ये शमी वृक्ष आणि जास्वंदाच्या बियांचे रोपण करित पुण्यातील ५१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपला बाप्पा साकारला. महाराष्ट्रात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला पुजेचा बाप्पा तयार करुन त्यात बियांचे रोपण करून स्वतःच्या हाताने मंगलमूर्ती साकारली.
जय गणेश व्यासपीठमधील तब्बल ५१ गणपती मंडळांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने पर्यावरण पूरक श्री गणेशाचे स्वरूप साकारले. अंकुर गणेशा कार्यशाळेचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. शाळेत करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, पराग ठाकूर, स्वप्निल दळवी, किरण सोनीवाल, शिरीष मोहिते, उमेश सपकाळ, कुणाल पवार, अमित जाधव, प्रशांत खंडागळे, हरिश खंडेलवाल  राजेंद्र तिकाणे, अनिल मोहिते, विशाल ओहाळ, निलेश पवार,आशिष गुंडकल, अभिषेक मारणे आदी गणेशोत्सव कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना पीयुष शाह यांची होती. सुप्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी यावेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
पीयुष शाह म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या मूर्तीत  गणेशाला आवडणारे शमी किंवा जास्वंद फुलाच्या बियांचे रोपण करण्यात आले आहे. हीच मूर्ती पूजेची मूर्ती म्हणून कार्यकर्ते आपल्या मांडवात बसविणार आहेत. आणि विसर्जन करून त्या बियातून अंकुर फुटल्यानंतर त्याचे झाड कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लावणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading