Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

Pune- गेल्या 24 तासात   229 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 278 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशे च्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 229नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 278रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96हजार 772 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85हजार 565इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8949जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2258रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 208रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7987 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading