शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, आदर्श शाळांचा गौरव

पुणे : शिक्षक दिनानिमित्त, “आदर्श शिक्षक पुरस्कार आणि शाळा गौरव समारंभ” चे आयोजन सिटी लॉन, पारगे नगर , कोंढवा येथे अहद फाउंडेशन, कोंढवा खुर्द चे संस्थापक अध्यक्ष मज़हर मनियार आणि सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.आदर्श शिक्षक , आदर्श शाळांचा गौरव करण्यात आला.डॉ. पी. ए. इनामदार यांना अहद फाउंडेशनच्या वतीने ’ शिक्षण रत्न पुरस्कार २०२१ ’ प्रदान करण्यात आला..

या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज, नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण, नगरसेविका नंदा लोणकर, हसीना आपा इनामदार, आबिद भाई सय्यद, मोहसीन भाई शेख, अब्दुल हफीज भाई आणि कोंढव्याचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोंढवा आणि परिसरातील शाळा आणि धार्मिक मदरश्या मधील प्रत्येकी एका शिक्षकाला आदर्श शिक्षक म्हणून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा/धार्मिक मदरशाचे प्राचार्यांना ’ ’ स्मृतिचिन्ह ’ देऊन गौरव करण्यात आला.

सर्व पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तसेच शाळांचे मुख्याध्यापक , मदरसाचे नाझीम, शिक्षकांचे प्रोत्साहन केल्याबद्दल अहद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मज़हर मनियार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अहद फाउंडेशनचे सचिव आबीद शाहाबाद , सहसचिव अताउल्ला शेख तसेच सर्व पदाधिकारी व मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: