Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी मोठा व्हावा असे वाटत असते- रूपाली चाकणकर

पुणे:  समाजात आदर्श पिढी घडविण्याचे काम शिक्षकचं घडवीत असतात आज मितीला कितीही मोठ्या पदावर काम करीत असले तरी शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे ही बाब शक्य होत असते तसेच प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी मोठा व्हावा असे वाटत असते असे रूपाली चाकणकर या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडुन शिक्षकांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर व पुणे शहर अध्यक्ष मृणाल वाणी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,अखिल मंडई अध्यक्ष आण्णा थोरात, स्वेता होणराव, रत्ना नाईक व मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.

यावेळी मृणाल वाणी म्हणाल्या की आज एवढी प्रगती केली ती बाब शिक्षकांच्या पाठबळामुळे होऊ शकली . आपल्या आई व वडील यांच्यानंतर शिक्षकांचे स्थान असून जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम शिक्षकच करत असतो . सर्व शिक्षकांचे यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ चे कुंभार सर ,रयत शिक्षण संस्थेच्या विद्या पवार ,नारायणी अंजनिय मोहन ,राणी अनिल तुपसमृध्ये धनश्री बडगुजर, अर्जुन रामचंद्र रावते ,रत्नकुमार आनंदराव जाधव,यावेळी संस्थापक मृणालताई वाणी यांचा सत्कार देखील करण्यात आला 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading