ओबीसींचा विषय पुढे करून, सरकारच्या मनात काही काळंबेर तर नाही ना? -राज ठाकरे

पुणे:ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं.असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले.

ओबीसी आरक्षण मुद्दा निकाली लागत नाही, इंपिरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको अशी भूमिका महाविकास आघाडी सरकार आणि भाजप नेत्यांनी घेतली आहे. मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत ते हे पक्षाचे शाखा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहेत .तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, या निवडणुका सरकारला आता नको असेल,राज्यातील महापालिका सरकारला चालण्याचे दिसत.त्यावर प्रशासक नेमणार आणि नंतर सगळ सरकारच बघणार,हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत.मला अस वाटत की उद्या असे नको व्हायला की,ओबीसींचा विषय पुढे करून,सरकार नक्की काही साध्य करते का? मात्र ओबीसी जनगणना झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही.


दहीहंडी व गणपतीच्या मुद्दा वर पण राज ठाकरे यांनी  भाष्य  केले. ते म्हणाले, सरकारचे सर्व पक्षांचे कार्यक्रम चालतात मग सणांवर निर्बंध का? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले असल्यास शाळा सुरू करण्यास हरकत नाही त्याच बरोबर 18 वर्षावरील च्या विद्यार्थ्यांचा लसीकरण झाले आहे त्यांच्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यास काही हरकत नाही .असं मत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: